: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या झालाय. फटाके पेटवताना झालेल्या अपघातात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूच्या बातमीनं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरलीय. आज सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं.

रीता बहुगुणा जोशी यांचा मुलगा यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके पेटवत होती. इतर मुलांसोबत तीदेखील घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेली होती. दिवाळीला फटाके पेटवताना चिमुरडीनं फॅन्सी ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली.

वाचा : वाचा :

सुरुवातीला इतर मुलांनी आरडा-ओरडा केला परंतु, लहान मुलं आपांपसात खेळत आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. घरातील सदस्य मुलांकडे पोहचेपर्यंत मुलगी गंभीररित्या भाजली होती. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं.

डॉक्टरांनी चिमुरडीचं शरीर ६० टक्के भाजल्याचं सांगत तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला. मंगळवारी सकाळीच मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी मुलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, उपचारा दरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला.

रीता बहुगुणा जोशी या प्रयागराजच्या खासदार आहेत. दिवाळीच्या दिवशी त्यांचं संपूर्ण कुटुंबी प्रयागराजमध्येच होतं.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here