२२ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांना ‘तेजस एक्सप्रेस’च्या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर पुढच्या आदेशापर्यंत ही रेल्वे सेवा बंद करण्यात येणार आहे. नवी दिल्ली – लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस २३ नोव्हेंबरनंतर तर मुंबई – अहमदाबाद दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस २४ नोव्हेंबरनंतर पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
करोनाकाळात या रेल्वेला प्रवासीच मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. २३ नोव्हेंबरनंतर या व्हीआयपी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी केवळ २०-२५ प्रवाशांनी बुकिंग केलं होतं. त्यानंतर प्रवाशांची कमी झालेली संख्या लक्षात घेता आयआरसीटीसीनं ही रेल्वे सेवा बंद करण्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. त्यानतंर रेल्वे बोर्डानं २३ नोव्हेंबरपासून पुढच्या आदेशापर्यंत तेजस एक्सप्रेसच्या सर्व सेवा रद्द केल्या आहेत.
आयआरसीटीसीकडून लखनऊ – दिल्ली – लखनऊ तेजस एक्सप्रेस द्वारे ४ ऑक्टोबर २०१९ रोजी देशात पहिल्यांदा कॉर्पोरेट सेक्टरच्या रेल्वेसेवेला प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेत खासगी ऑपरेटर्ससाठी रेल्वे चालवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.
‘तेजस एक्सप्रेस’ला पर्याप्त संख्येत रेल्वे प्रवासी मिळत नसल्याचं सांगत लखनऊ जंक्शनपासून ते नवी दिल्ली पर्यंत चालणारी ही रेल्वे सेवा बंद करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.
वाचा : वाचा :
यापूर्वी मार्च महिन्यात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तेजस एक्सप्रेसची सेवा रद्द करण्यात आली होती. जवळपास सात महिने सेवा बंद राहिल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून ही रेल्वे रुळावर उतरली होती. त्यानंतर, २३ नोव्हेंबरपूर्वी दिवाळीच्या दिवशी अर्थात १४ नोव्हेंबर रोजीही प्रवासी नसल्याकारणानं सेवा रद्द करण्यात आली होती.
उशिर झाला तर रेल्वे प्रवाशांना नुकसान भरपाई देणारी ‘तेजस एक्सप्रेस’ ही देशातील पहिली रेल्वे आहे. हा रेल्वे मंत्रालयाचा एक सार्वजनिक उपक्रम आहे. रेल्वेद्वारे कॉम्प्लीमेन्ट्री मिल आणि १० लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्सची सुविधा दिल्यानंतरही १८ नोव्हेंबर रोजी ६६२, १९ नोव्हेंबर रोजी ६७० जागा रिकाम्या राहिल्या होत्या.
महत्त्वाचं म्हणजे, केवळ तेजस एक्सप्रेसलाच प्रवासी मिळत नाही, अशी परिस्थिती नाही. दिल्ली जाणाऱ्या आणि इतर एसी रेल्वे तसंच शताब्दी रेल्वेनाही या दिवसांत प्रवासी संख्या कमी झाल्यानं फटका बसत असलेला दिसून येतोय.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times