औरंगाबाद: ‘भारतीय जनता पक्षानं मला अनेक डागण्या दिल्या आहेत. आता मला भाजपला पाडायचं आहे,’ अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

तीन वेळा खासदार, दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे आमदार, राज्य सरकार व केंद्रात राज्यमंत्री पद भूषविलेल्या गायकवाड यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. मागच्या १३ वर्षांपासून मला कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. पक्षात मागूनही काम मिळत नाही,’ अशी व्यथा त्यांनी मांडली.

वाचा:

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, हा अर्ज मागे घेत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप सोडल्यानंतर गायकवाड पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत आताच काही सांगणार नाही. आता मला भाजपला पाडायचं आहे. उद्यापासून सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मराठवाडा दौरा सुरू करणार आहे.’

वाचा:

जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. मधल्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. मात्र, नंतर पुन्हा ते स्वगृही परतले होते. गायकवाड यांच्याकडं संघटनात्मक व निवडणुकांच्या कामाचा मोठा अनुभव आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here