वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुस्तकाची चर्चा सुरू असून अनेक घटनांच्या पडद्यामागील गोष्टी समोर येत आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार करण्याच्या मोहिमेवरही भाष्य केले आहे. पाकिस्तानला या कारवाईची माहिती जाणीवपूर्वक देण्यात आली नव्हती असेही आता समोर आले आहे.

अमेरिकेच्या लष्कराने एबाटाबादमध्ये ओसामा बिन लादेनविरोधात कारवाई करत त्याला कंठस्नान घातले होते. ही कारवाई अतिशय गुप्तपणे पार पडली होती. पाकिस्तान सरकारलादेखील या कारवाईची माहिती नव्हती. या कारवाईच्या काळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. लादेनविरोधातील कारवाईत पाकिस्तानला सहभागी करून घेण्यास बराक ओबामांनी नकार दिला होता. पाकिस्तानी सैन्य, विशेषत: त्यांच्या गुप्तचर विभागातील काहीजणांचे तालिबान आणि अल कायदासोबतही संबंध असल्याचे उघड गुपित होते.

वाचा:

ओबामा यांनी आपल्या ‘ए प्रॉमिस्ड लँड’ नावाच्या एका पुस्तकात या घटनेची माहिती दिली आहे. संपूर्ण जगासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनचा २ मे २०११ रोजी खात्मा करण्यात आला. या गुप्त मोहिमेला तत्कालीन संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स आणि तत्कालीन उपराष्ट्रपती व सध्याचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विरोध केला होता. एबटाबादमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या वसाहतीजवळील भागात लादेन वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला ठार करण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार करण्यात आला. या मोहिमेची गोपनीयता बाळगण्याचे मोठे आव्हान समोर होते, असे ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

वाचा:

ओबामा यांनी सांगितले की, आमच्या या मोहिमेबाबत पुसटशीही कल्पना ओसामाला आली असती तर आमच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असते. त्यामुळेच काही मोजक्या लोकांनाच या मोहिमेची माहिती होती असे ओबामा यांनी म्हटले. पाकिस्तान सरकारने आमच्या दहशतवादविरोधी मोहिमेत आम्हाला सहकार्य केले होते. अफगाणिस्तानमध्येही अमेरिकन सैन्याला आवश्यक गोष्टी पोहचवण्यासाठी मदत केली. मात्र, पाकिस्तानी लष्कर आणि विशेषत: गुप्तचर संस्थांमधील काहींचे तालिबान आणि अल कायदासोबत संबंध होते. अफगाणिस्तान सरकार हे कमजोर रहावे आणि अफगाणिस्तान भारताच्या आणखी जवळ जाऊ नये यासाठीदेखील ही मंडळी कार्यरत होते असे ओबामा यांनी म्हटले.

वाचा:

एबाटाबादमध्ये ओसामा राहत असलेल्या ठिकाणापासून पाकिस्तान लष्कर अतिशय जवळ होते. त्यामुळे ओसामाविरोधात कारवाई करण्यासाठी अखेर दोन पर्याय समोर आले. यामध्ये या मोहिमेला अधिकृत करून एक पथक हवाई हल्ला करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे एका हेलिकॉप्टरमधून त्या परिसरात एका छापा मारणार आणि पाकिस्तानी पोलीस अथवा लष्कर कोणतीही कारवाई करण्याआधीच तेथून निसटून जाणे. ओबामा आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमने दुसरा पर्याय निवडला.

वाचा:

ओबामा यांनी सांगितले की, या कारवाईनंतर त्यांनी देशांतर्गत आणि राष्ट्रीय स्तरावर अनेकांसोबत चर्चा केली. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यासोबत चर्चा करणे हे कठीण होते असे ओबामा यांनी पुस्तकात म्हटले. मात्र, झरदारी यांनी अभिनंदन करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ओबामा यांनी नमूद केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here