वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. आता समोर आलेल्या एका नव्या संशोधनानुसार, एक सर्वसाधारण माउथवॉशदेखील करोनाच्या विषाणूंचा ३० सेकंदात खात्मा करू शकतात. कार्डिफ विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. काही माउथवॉशमध्ये असलेल्या विशिष्ट घटकामुळे विषाणूंचा सामना करता येऊ शकतो.

कार्डिफ विद्यापीठाचे प्राध्यापक डेविड थॉमस यांनी सांगितले की, माउथवॉशमध्ये असलेल्या cetypyridinium chloride (CPC)या घटकामुळे करोनाच्या विषाणूंशी लढता येऊ शकते. जवळपास १२ आठवडे सुरू असलेल्या चाचणी अहवालाचा अद्याप peer review करणे बाकी आहे. मात्र, एक आठवड्यापूर्वी करण्यात आलेल्या आणखी एका संशोधनामुळे या दाव्याला बळ मिळाले आहे. cetypyridinium chloride (CPC)आधारीत माउथवॉशमुळे करोना विषाणूंचा व्हायरल मोड कमी होतो. या सुरुवातीच्या परिणामांनंतर क्लिनिकल चाचणी करणे अद्याप बाकी आहे. या चाचणीत ओव्हर-द-काउंटरमध्ये मिळणाऱ्या माउथवॉशमध्ये लाळेत असलेल्या विषाणूचा खात्मा करण्याची ताकद आहे की नाही, हे पाहिले जाणार आहे.

वाचा:

वाचा:

डॉ. थॉमस यांनी सांगितले की, माउथवॉश विषाणूचा प्रभावीपणे खात्मा करतो, असे प्रयोगशाळेत दिसून आले आहे. आता रुग्णांवर याची चाचणी करावी लागणार असून त्यातून निष्कर्ष समोर येतील असे त्यांनी सांगितले.

वाचा:

SARS-CoV-2 बाहेरील पृष्ठभागावर lipid membrane असते. तर, माउथवॉशमध्ये असलेल्या इथनॉल (ethanol)दुसऱ्या विषाणूंच्या पृष्ठाभागाला तोडू शकतो. त्याआधी सार्स आणि मर्सच्या विरोधात आयोडिनयुक्त माउथवॉश प्रभावी असल्याचे दिसून आले होते. मात्र, अधिक संशोधनाची आवश्यकता असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या संशोधनाचे परिणाम पुढील वर्षी जाहीर होण्याची शक्यता आहे.

वाचा:

दरम्यान, काही माउथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅण्टीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे करोनाचा विषाणू निष्क्रिय होऊ शकतो. वैद्यकीय नियतकालिक ‘मेडिकल वायरोलॉजी’ या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी हा दावा करण्यात आला होता. अमेरिकेतील पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी करोना विषाणू निष्क्रिय करण्याच्या क्षमतेबाबत जाणून घेण्यासाठी काही माउथवॉश आणि नेजोफेरिंजिअल रिन्जची चाचणी केली. यामध्ये करोनाचा विषाणू निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचे समोर आले. या उत्पादनांमध्ये फैलावणाऱ्या विषाणूंचे प्रमाण कमी करण्याची क्षमता असू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला. प्रा. क्रेग मेयर्स यांनी सांगितले की, करोनाला अटकाव करणारी लस येईपर्यंत करोनाचा फैलाव होणार नाही याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या उत्पादनांची चाचणी केली, ती उत्पादने सहज उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here