मुंबईः प्रमुख बाळळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक व महाराष्ट्रातील नेत्यांनी भेट दिली होती. भाजप नेते नारायण राणे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे.

माननीय शिवसेना प्रमुख स्व. यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वासोबत तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती, असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील सरकार नितीमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘बाळासाहेब आज तुम्ही नाहीत पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही. स्वर्गीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आवाहन,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतरही राणे कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात राणेंच्या आरोपांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यामुळं राणे कुटुंब आणि ठाकरे यांच्यातील हे शाब्दिक युद्ध बराचकाळ टिकलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here