नवी दिल्ली: दहशतवाद () आज जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या देशांना दोषी ठरवले जावे आणि या समस्येचा संघटितपणे सामना केला पाहिजे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांनी ब्रिक्स समुहाच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत () पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानला फैलावर घेतले. यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा यूएन सुरक्षा परिषदेतील बदलाचा मुद्दा देखील उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिक्स समुहाच्या शिखर परिषदेत भाग घेतला. करोना महासाथीच्या या काळात ब्रिक्स शिखर परिषद यावेळी व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली. ब्रिक्सच्या सफल आयोजनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे अभिनंदन केले. मात्र आपल्या संबोधनात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचे नावही घेतले नाही. भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण जगाला एका कुटुंबासारखे मानले असून शांती राखण्यासाठी सर्वाधिक सैनिक भारताने गमावले असल्याचेही मोदी म्हणाले.

ग्लोबल गव्हर्नन्सची विश्वासार्हता आणि परिणामकारकता दोन्हींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे यात काळानुसार बदल करण्यात आलेले नाही, असे मोदी म्हणाले. ग्लोबल गव्हर्नन्स आताही ७५ वर्षे जुन्या विश्वाची मानसिकता आणि वास्तविकतेवर आधारित आहे. यूएन सुरक्षा परिषदेत बदल होणे अनिवार्य असल्याचे भारताचे म्हणणे असल्याचे मोदी म्हणाले. या विषयावर आम्हाला आमच्या ब्रिक्स सहकाऱ्यांची अपेक्षा असल्याचेही ते पुढे म्हणाले.

यूएनव्यतिरिक्त इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था देखील वर्तमान वास्तविकतांच्या अंतर्गत काम करत नाहीत. WTO, IMF, WHO सारख्या संस्थांमध्ये देखील सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मोदी पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
कोविडनंतर जागतिक स्तरावरील रिकव्हरीमध्ये ब्रिक्स अर्थव्यवस्थेची भूमिका अतिशय महत्वाची असेल असे मोदी म्हणाले. आमच्यामध्ये जगातील ४२ टक्क्याहून अधिक लोकसंख्या आहे. आमचे देश जागतिक अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन आहेत. ब्रिक्स देशांतर्गत परस्पर व्यापाराला चालना देण्याचा मोठा वाव आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here