मुंबई: काल म्हणजेच सोमवारी दिवाळी पाडव्याचा सण उत्साहात पार पडला. विवाहबंधनात असलेल्या अनेक सेलिब्रिटींनी पाडव्याच्या खास अंदाजात पती पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री हिच्या सोशल मीडिया पोस्टने. तिनं होणाऱ्या पतीला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीनं होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबतचे फोटो शेअर करत पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार असल्याचंही चाहत्यांना सांगितलं. पुढच्या वर्षी पाडवा मिसेस म्हणून साजरा करणार असल्याचं सोनालीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.२ फेब्रुवारी रोजी सोनाली आणि कुणाल यांचा दुबईत साखरपुडा झाला होता. पण काही महिन्यानंतर म्हणजे १८ मे रोजी तिनं साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं होतं.

सिनेसृष्टीतील आणखी एक चर्चेत असलेली जोडी म्हणजे आणि सिद्धार्थ चांदेकर. मितालीनं देखील सिद्धार्थसोबतचे काही गोड फोेटो शे्अर करत पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. मितालीनं फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘Mr. and Mrs. next year’ हॅप्पी दिवाली’, असं म्हटलं आहे.

तसंच अभिनेत्री हिनं देखील पुढच्या वर्षीच्या पाडव्याची वाट पाहतेय, असं म्हटलं आहे. अभिज्ञानं होणारा पती मेहूल पैससोबतचा फोटो शेअर करत तिची लग्नाबद्दल असलेली ओढ शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here