नवी दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे () केवळ २९,१६३ इतके कमी रुग्ण आढळले असले तरी देखील येत्या दोन आठवड्यानंतर दिवाळीचा सण (Diwali) आणि निवडणुकांचा (Elections) परिणाम दिसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुका, दुर्गापूजा (Durga Pooja), दिवाळी दरम्यान लोकांनी केलेल्या व्यवहारांचा परिणाम येत्या काही आठवड्यात पाहायला मिळू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) म्हटले आहे. (an increase in corona patients may occur after diwali and elections)

नव्या रुग्णवाढीवर आपले सावधगिरी बाळगत पूर्णपणे लक्ष असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये, तसेच निवडणुकांच्या काळात लोकांनी निष्काळजीपणा दाखवला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे संसर्ग जलदगतीने वाढू शकतो आणि येणाऱ्या काही आठवड्यात तो दिसूही शकतो, असे आरोग्य मंत्रालयाला वाटते.

चाचण्यांची संख्या वाढवणार
दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा होत असून या चर्चांमध्ये आता अधिकाधिक चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून चाचण्याच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही. हे लक्षात घेत आता चाचण्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. आता दररोज एक लाखांहून अधिक चाचण्यात होतील. तसेच, दिल्लीत आयसीयू बेडची संख्या ३५०० हून वाढवून ती ६ हजार इतकी करण्यात येणार आहे.

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३० हजारांहून कमी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. या पूर्वी १५ जुलैला एका दिवसात ३० हजाराहूंन कमी रुग्णवाढ नोंदवली गेली होती. त्यावेळी नव्या रुग्णांची संख्या २९ हजार ४२९ इतकी नोंदवली गेली होती.

क्लिक करा आणि वाचा-
देशभरात कोविड रुग्णांची सख्या ८८,७४,२९० इतकी झाली आहे. यांपैकी एकूण ४,५३,४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ४९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १,३०००० पर्यंत पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत १२,०७७ ची घट झाली आहे. या दरम्यान ४०, ७९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आता देशात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८२,९०,३७१ इतकी झाली आहे. याचा अर्थ करोनाचा रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होत तो ९३.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण रुग्णसंख्येत सक्रिय रुग्णांची संख्या ५.११ टक्क्यांवर आली आहे. मृत्युदराबाबत देखील भारतातील स्थितीत सुधारणा होत आहे. हा दर आता १.४७ टक्क्यांवर घसरला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here