मुंबई: राज्यात आज ६८ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ८४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून आज हा आकडा ८१ हजारांच्या टप्प्यावर आला आहे. ( Latest News Updates )

वाचा:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनामृत्यूंचा आकडा कमी झाल्याचे दिसत आहे. सोमवारी राज्यात ६० करोना बाधितांचा मृत्यू झाला होता तर आज राज्यात ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या मृतांपैकी सर्वाधिक १४ मृत्यू पालिका हद्दीत झाले आहेत. करोनामुळे राज्यात आतापर्यंत ४६ हजार १०२ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील २.६३ टक्के एवढे आहे.

वाचा:

आज दिवसभरात २ हजार ८४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५ हजार १२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery Rate) ९२.६४ टक्के इतके झाले आहे. राज्यात आजवर करोनाच्या ९८ लाख ४७ हजार ४७८ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ५२ हजार ५०९ चाचण्यांचे (१७.८ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत असून आजच्या नोंदीनुसार सध्या ८१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १६ हजार ३८४ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात १३ हजार ४६६ आणि मुंबईत १२ हजार ३६५ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. राज्यात ७ लाख ९१ हजार १२० जणांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे तर ५ हजार ३६७ रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइमध्ये ठेवण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here