पाटणाः बिहार सरकारमध्ये ( ) पहिल्यांदाच खातेवाटपात संख्येच्या तुलनेत जेडीयूपेक्षा भाजप ( bjp ) वरचढ दिसतोय. पण जेडीयूकडे खाती कमी असली तरी महत्त्वाचे खाती मात्र कायम आहेत. जेडीयूचे ( jdu ) मुख्यमंत्र्यांसह ६, तर भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह ७ जणांनी शपथ घेतली. मंत्र्यांचे खातेवाटत मंगळवारी जाहीर झाले. ( nitish kumar ) यांच्या नेतृत्वात जेडीयूकडे भाजपपेक्षा अधिक महत्त्वाची खाती आहेत.

भाजपाने दबाव आणूनही मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालय सोडलं नाही. अभियंता असलेल्या मुख्यमंत्री नितीशकुमार ( bihar cm nitish kumar ) यांच्याकडे ५ खाती आहेत. तर १२ वी पास उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना अर्थ आणि आयटीसह ६ खाती देण्यात आली आहेत. ही सर्व खाती सांभाळण्यासाठी तारकिशोर यांना धावपळ करावी लागणार आहे. कारण त्यांच्याकडील सर्व खात्यांची कार्यालयं ही पाटण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर नितीशकुमार यांच्याकडी सर्व खाती ही सचिवालयातच आहेत.

तारकिशोर पहिल्यांदाच झाले मंत्री

नितीशकुमार यांनी गृह खात्यासह आणखी ४ विभागांची जबाबदारी घेतली आहे. सामान्य प्रशासन, देखरेख, कॅबिनेट सचिवालय आणि निवडणूक विभाग यांचा समावेश आहे. पण उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे नितीशकुमार यांच्यापेक्षा अधिक खाती आहेत. आपल्या आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अभियंता असलेले नितीशकुमार हे हीच खाती सांभाळत आले आहेत. दुसरीकडे, फक्त १२ वी पास असलेले तारकिशोर प्रसाद यांना प्रथमच उपमुख्यमंत्री बनवण्यासह ६ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तारकिशोर हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे अर्थ, वाणिज्य, पर्यावरण, वन आणि हवामान, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, नगरविकास आणि गृहनिर्माण ही खाती आहेत. अशा परिस्थितीत पहिल्यांदाच मंत्री झालेल्या तारकिशोर यांना ही सर्व खाती डोईजड होण्याची शक्यता आहे.

मोठा भाऊ म्हणून भाजपकडे जास्त खाती

एनडीएला जनतेने दिलेल्या कौल पाहता भाजपकडे सर्वाधिक ७४ जागा जिंकल्या आहेत. यामुळे एनडीएत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. या दृष्टीने जेडीयूपेक्षा अधिक खाती भाजपकडे आहेत. आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीसमवेत भाजपच्या कोट्यातून केवळ १३ मंत्री होते. तर जेडीयूचे मुख्यमंत्र्यांसह २२ मंत्री होते.

आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना दिलेली तिन्ही खाती आधी जेडीयूकडे होती. ती आता भाजपकडे आली आहेत. सध्या भाजपचे ७ मंत्री आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आणखी १२ जण मंत्री होतील. यानुसार भाजपचे मंत्रिमंडळात एकूण १९ मंत्री असतील.

त्याचबरोबर मंत्रिमंडळात जेडीयूमधून ५ मंत्री आहेत. जेडीयूकडून आणखी १० जण मंत्री होऊ शकतात. बिहारमध्ये एकूण ४४ खाती आहेत. पण मंत्र्यांकरता केवळ ३६ खाती मंजूर झाली आहेत. उर्वरीत सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत.

दिलदारपणे खातेवाटप

विजय कुमार चौधरी यांना ५, अशोक चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव यांना प्रत्येकी ४ खाती दिली गेली आहेत. उपमुख्यमंत्री रेणू देवी, मंगल पांडे, अमरेंद्र प्रताप आणि जीवेश कुमार यांना प्रत्येकी ३ खात्यांची जबाबदारी सांभाळावी लागेल. राम सुंदर राय आणि संतोषकुमार सुमन हे दोन खाती बघतील. शीला कुमारी, मेवालालाल चौधरी, मुकेश सहनी आणि रामप्रीत पासवान यांच्याकडे प्रत्येकी एका खात्याची जबाबदारी आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here