वाचा:
छठपूजेचा उत्सव यंदा २० आणि २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. बिहार, आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू किनारी दरवर्षी छठपूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. यंदा मात्र करोनामुळे मुंबई पालिकेने काही अटी घातल्या असून त्यात मुख्य अट म्हणजे समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वाचा:
चौपाटी, नदीकाठ वा तलावांवर छठपूजेचे आयोजन केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळेच अशा ठिकाणी छठपूजेचे आयोजन करण्यास यंदा प्रतिबंध करण्यात येत आहे, असे पालिकेने नमूद केले आहे. गर्दी टाळून हे पर्व साजरे व्हावे म्हणून पालिका संबंधित संस्थांना परवानगी देईल. ही परवानगी विभागवार देण्यात येईल. परवानगी देताना जे नियम व अटी घालण्यात येतील त्यांचे पालन संबंधित संस्थांनी करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संकटामुळे यंदा सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव आणि हे प्रमुख सण व उत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरे करण्यात आले. ही बाब लक्षात घेता छठपूजेचा उत्सवही साधेपणाने साजरा व्हावा, या उत्सवात सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम काटेकोरपणे पाळले जावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने आपल्या नियमावलीतून केले आहे.
वाचा:
दरम्यान, महाराष्ट्रात राजधानी मुंबईला करोनाची सर्वाधिक झळ बसलेली आहे. देशातील करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट अशी मुंबईची ओळख झाली होती. या संकटाशी नेटाने मुकाबला करत मुंबई आज सावरताना दिसत आहे. पालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. त्यामुळेच सण आणि उत्सवांच्या धामधूमीत पुन्हा मुंबईचे आरोग्य ढासळू नये म्हणून आवश्यकती सर्व खबरदारी पालिका घेत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times