काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ९ सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हरयाणातील मोरनी येथीलझोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या मुलींचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओत लहान मुली मदतीसाठी आवाहन करत होत्या. शाळा बंद आहेत,ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. स्मार्टफोन नसल्यानं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाही, असं त्या मुली व्हिडिओत म्हणत होत्या. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोनू सूद आणि त्याचा मित्र करण गिल्होत्रा यांनी या मुलींपर्यंत पोहोचून त्यांना मदत केली आहे.
सोनू सूद आणि करण गिल्होत्रा यांनी व्हिडिओतील विद्यार्थ्यीनींच्या शिक्षकांना संपर्क केला. शाळेत असे किती विद्यार्थी आहेत, की त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी मोबाइल नाहीए, यांची माहिती त्यांनी घेतली. आणि गरजू १३ ते १४ विद्यार्थ्यांची नावं काढून त्यांना हे स्मार्टफोन देण्यात आले. स्मार्टफोनची भेट मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नाहीए.
यापूर्वी देखील केली आहे मदतहिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका गरिब कुटुंबाला मुलांच्या ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून मोबाइल विकत घ्यायचा होता. पण त्यांच्याकडे स्मार्टफोन विकत घेण्याएवढेही पैसे नव्हते. अखेर त्यांनी घरातली गाय विकली आणि फोन विकत घेतला. ही बातमी सोनूला कळताच त्याने ट्वीट करून त्या व्यक्तीची मदत करण्याचा आश्वासन दिलं. तसंच लोकांना त्या व्यक्तीची माहिती देण्याचीही विनंती केली. ‘चला या व्यक्तीला त्याची गाय परत देऊया.. कोणी मला या व्यक्तीची माहिती देऊ शकतं का..’ असं ट्वीट त्याने यावेळी केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times