जम्मू-काश्मीरला दहशतवाद आणि अशांततेच्या युगात काँग्रेस पक्ष आणि गुपकार गँगला परत न्यायचं आहे. ते दलित, महिला आणि आदिवासींचे अधिकार हिसकावून घेऊ इच्छितात. हे अधिकार आम्ही कलम ३७० हटवून दिले आहेत. याच कारणामुळे देशातील जनता त्यांना प्रत्येक ठिकाणी नाकारत आहे. जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहील. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्या अपवित्र ग्लोबल आघाडीला कधीही सहन करणार नाहीत. गुपकार गँगने देशाच्या भावनेसोबत चाललं पाहिजे, अन्यथा जतना त्यांना बुडवेल’, असं अमित शहा म्हणाले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या मुद्द्यावर पक्षाची बाजू मांडली. ‘खोटं बोलणं, फसवणूक करणं आणि संभ्रम निर्माण करणं ही मोदी सरकारची वृत्ती बनली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असलेले गृहमंत्री अमित शहा जम्मू, काश्मीर आणि लडाखबद्दल अशी खोटी, दिशाभूल करणारी आणि भ्रामक विधाने करत आहेत. ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे’, असा पलटवार काँग्रेसने केलाय.
जम्मू-काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्र्यांनी ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनीही अमित शहा यांच्या गुपकार गँग संबंधित टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आघाडी करून निवडणुका लढवणंही आता देशद्रोह ठरणार आहे का? सत्तेसाठी हपापलेला भाजप अनेक युती करू शकतो. पण आम्ही एकजूट होऊन निवडणूक लढतोय. मग यामुळे राष्ट्रीय हितांना ठेच कशी पोहोचते. जुन्या सवयींपासून मुक्त होणं सोपं नाही. टुकडे-टुकडे गँगमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे, अशी चर्चा भाजपने आधी सुरू केली. आणि आता ते ‘गुपकार गँग’ म्हणून आम्हाला देशद्रोही ठरवायचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे भाजपच राज्यघटनेचं उल्लंघन करतं आहे, असं उत्तर मेहबूबा मुफ्तींनी दिलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times