बेंगळुरूः भारतीय गो-एअर विमानाचे ( ) पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग ( ) करावं लागलं. मेडिकल इमर्जन्सीमुळे रियाधहून दिल्लीला ( ) येणारे विमान फ्लाइट क्रमांक ( G8 – 6658A) कराची विमानतळावर ( ) उतरवावं लागलं. काही कालावधीनंतर हे विमान दिल्लीसाठी रवाना झालं. ज्या प्रवाशासाठी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं त्याचा जीव वाचवता आला नाही.

गो एअरच्या या विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. यामुळे पाकिस्तानच्या प्रशासनाने मानवी दृष्टीकोनातून विमानाच्या लँडिंगला परवानगी दिली होती. माहितीनुसार, एका ३० वर्षांच्या व्यक्तीला विमान प्रसादरम्यान हृदयविकाराला झटका आला होता. ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील बरेलीची राहणारी होती.

हा प्रवासी विमानात बेशुद्ध झाला होता. यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमानतळावरील डॉक्टरांनी तपासल्यावर प्रवाशाला मृत घोषित केलं. यानंतर विमानाला उड्डाणांची परवानगी देण्यात आली. मृत प्रवाशाची माहिती अद्याप हाती आलेली नाही.

याच महिन्यात ८ नोव्हेंबरला रियाधहून बेंगळुरूला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग मुंबई विमानतळावर करण्यात आले होते. हायड्रॉलिक गळतीनंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यादरम्यान कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

हायड्रॉलिक गळतीनंतर रियाधहून बेंगळुरूला जाणारी इथिओपियन एअरलाइन्सच विमानाचे (फ्लाइट- ET690) इमर्जन्सी लँडिंग मुंबई विमानतळावर करण्यात आले. हा निर्णय हायड्रॉलिक गळतीमुळे घेण्यात आला, असं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.

बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली

भारतात व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वाहतुकीवरील बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण मालवाहतूक आणि काही देशांमध्ये केलेल्या करारामुळे विशेष उड्डाणं सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here