पीएम मोदी यांनी यासंदर्भात ट्विट केलं. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर बोललो. आम्ही भारत-अमेरिका सामरिक भागीदारीसाठी आमच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती, हवामान बदल आणि भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील प्रदेश यासारख्या द्वपक्षीय प्राधान्यता आणि चिंतांवरही चर्चा झाली, असं मोदींनी ट्विट करून सांगितलं.
अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचंही पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केलं. कमला हॅरीस यांचं यश हे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या नागरिकांसाठी अभिमान आणि प्रेरणा देणारं आहे, असं मोदी म्हणाले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतरही पंतप्रधान मोदींनी जो बायडन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी जो बायडन यांचं अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केलं होतं. भारत-अमेरिका संबंध अधिक उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकत्र काम करण्याची आशा करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी कमला हॅरीस यांचेही अभिनंदन केले होते. सर्व भारतीय-अमेरिकन नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असं त्यावेळी मोदी म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times