रांचीः बिहार निवडणुकीत ( bihar election ) महाआघाडीचा पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसवर ( congress ) टीका होत आहे. आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी ) प्रश्न उपस्थित केले. आता कॉंग्रेसचे माजी खासदार ( ) यांनीही कॉंग्रेसमधील मोठ्या फेरबदलाची मागणी केली आहे. आता केंद्रीय नेतृत्वात आता मोठे बदल करण्याची गरज आहे, असं अन्सारी म्हणाले.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, ( ), प्रियंका गांधी यांना पत्रंही लिहिलं आहे. पक्ष बळकट करण्यासाठी अनेक बदल केले पाहिजेत, असं फुरकान अन्सारी म्हणाले. त्यांनी कॉंग्रेसचे झारखंड प्रभारी आरपीएन सिंग यांची खिल्लीही उडवली. ते साधे ब्लॉक अध्यक्ष होण्यासाठीही पात्र नाही, असं ते म्हणाले.

ते दिल्लीहून आलेत आणि इथं ते अधिकार गाजवत आहेत. आम्ही काही त्यांचे नोकर नाहीए, त्यांचा आदेश ऐकायला. राज्यात कॉंग्रेसच्या महाआघाडी सरकार असले तरी झारखंडमध्येही कॉंग्रेसचे संघटन कमकुवत आहे. यामुळे पक्ष संघटना बळकट करण्याची गरज आहे. त्यांनी राहुल गांधींच्या सल्लागारांवरही प्रश्न उपस्थित केला.

राहुल गांधी जे सांगतात ते नागरिकांना समजत नाही. यासाठी राहुल गांधींना सल्ला देणारे दोषी आहेत, असं म्हणत अन्सारी यांनी झारखंडमधील एका कार्यक्रमाचं उदाहरणही दिलं. राहुल गांधींची कहलगाव एक सभा झाली. पण नागरिकांना त्यांचं भाषणचं समजलं नाही. त्यांच्या आजूबाजूला बसलेले सल्लागार होते ते त्यांना अचूक सल्ला देऊ शकत नव्हते. राहुल गांधींच्या आसपास सर्व एमबीए पदवी घेतलेले आहेत. एमबीए पात्रता असलेले चांगलं व्यवस्थापन कार्य करू शकतात. पण चांगला राजकीय सल्ला ते देऊ शकत नाही. यामुळे राहुल गांधींना चांगला राजकीय सल्लागार नियुक्त करण्याची गरज आहे, असं फुरकान अन्सारी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here