म. टा. वृत्तसेवा, उरण

मुंबईहून किल्ले रायगडावर गेलेल्या शिवप्रेमींपैकी एका पर्यटकाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. रमेश गुरव असे या पर्यटकाचे नाव असून, ते मुंबईतील विद्याविहार येथे राहतात.

रमेश गुरव हे नुकतेच मित्रपरिवारासह किल्ले रायगडावर गेले होते. आठ जणांचा हा गट किल्ले रायगडावर दिवाळीनिमित्त पणत्या लावण्यासाठी निघाला होते. याचदरम्यान, रायगडावर पायऱ्या चढत असताना, रमेश गुरव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे त्यांचायवर प्राथमिक उपचार करून त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here