शेतातील कचरा जाळण्यामुळे फैलावलेल्या प्रदूषणात फटाक्यांची भर, थंडीचा वाढता प्रभाव, दिवाळीच्या खरेदीसाठी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठा यामुळे राजधानी दिल्लीत झाला आहे. नोव्हेंबरच्या पूर्वार्धातच करोना रुग्णसंख्येत एक लाखाची भर पडली असून सुमारे बाराशे जणांचा झाला आहे. विक्राळ रूप धारण करीत असलेल्या करोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा तात्पुरत्या बंद करण्याची मागणी केजरीवाल सरकारने नायब राज्यपालांकडे केली आहे.
दिल्लीतील विवाह सोहळे आणि सभा-मेळाव्यांसाठी दिलेल्या सर्व सवलती मागे घेण्याचा निर्णय ‘आप’ सरकारने घेतला आहे. यापुढे विवाह सोहळ्यांमध्ये दोनशेऐवजी ५० जणांनाच सहभागी होता येईल. करोनाचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून दिल्ली सरकारने छठ पूजेनिमित्त २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांना लॉकडाउनसाठी केंद्राची मंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार केंद्राकडे स्थानिक बाजारपेठांमध्ये लावण्यासाठी मंजुरी मागितली असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.
वाचा : वाचा :
प्रदूषणाचा धोकादायक स्तर गाठलेल्या दिल्लीत दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये लोकांनी मास्क वापरले नाही किंवा सुरक्षित अंतरही पाळले नाही. त्यामुळे करोनाचा उद्रेक झाला. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत करोनाच्या १ लाख १ हजार ७० नव्या प्रकरणांची नोंद झाली आणि १६ नोव्हेंबरपर्यंत १२०२ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत गेल्या आठवड्यापासून करोनामुळे रोज ८५ ते १०० जण मृत्युमुखी पडत आहेत. कडाक्याच्या हिवाळ्यात दिल्लीत दररोज पंधरा हजार रुग्णांची भर पडेल, असे भाकित तज्ज्ञांनी वर्तविले आहे. करोनाविरोधातील लढ्यात दिल्ली सरकारसोबत केंद्र सरकारही उतरले असून रुग्णांसाठी इस्पितळांमध्ये साडेसातशे आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचे केंद्राने आश्वासन दिले आहे. शिवाय करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे ‘बत्ती ऑन, गाडी ऑफ’ या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत लाल सिग्नल असताना गाडी बंद करावी, असे संदेश देणारे फलक घेतलेले स्वयंसेवक चौकाचौकात उभे राहून वाहनचालकांमध्ये जागृती करीत आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन संकटात
करोनाच्या वाढत्या दहशतीमुळे दरवर्षी नोव्हेंबरअखेर ते डिसेंबरअखेर होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिन्याच्या अंतराने होत असल्यामुळे दोन्ही अधिवेशनांचे एकत्र आयोजन करण्याचा विचार सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे एका वर्षात संसदेचे तीन अधिवेशन आयोजित करण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. चालू वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच पावसाळी अधिवेशन करोनाच्या संकटामुळे मुदतीपूर्वीच गुंडाळावे लागले होते. अधिवेशनाची मुदत निश्चित करणाऱ्या कॅबिनेटच्या संसदीय समितीची अद्याप बैठकच झालेली नाही.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times