तिरुअनंतपुरम: भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार देशद्रोही असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते यांनी केले आहे. ते केरळमधील एका सभेला संबोधित करत होते. या वेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही टीकास्त्र सोडले. काश्मीरमध्ये ३६ मंत्री पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही टीका करत काश्मीरमध्ये जाणारे मंत्री डरपोक असल्याचे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे लोक धोका देणारे असल्याचे अय्यर म्हणाले. हे लोक जनतेचे प्रतिनिधी नाहीत. जर ते लोकांचे प्रतिनिधी असते तर लोकांनी त्यांना यापूर्वीच निवडून दिले असते असेही अय्यर म्हणाले. सभेला संबोधित करताना त्यांनी काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकार काश्मीर खोऱ्यात आपले ३६ मंत्री पाठवत आहे. हे मंत्री इतके डरपोक आहेत, की त्यांपैकी ३१ मंत्री जम्मूमध्ये जात आहेत, तर फक्त ५ मंत्री काश्मीरला जात आहेत.

या केंद्रशासित प्रदेशाचा केंद्राच्या संपर्क कार्यक्रमाअंतर्गत ३६ केंद्रीय मंत्री जम्मू आणि काश्मीरचा दौरा करत आहेत. यांपैकी फक्त ५ मंत्री ४ दिवसांमध्ये काश्मीरचा दौरा करणार आहेत. उर्वरित मंत्री जम्मू भागाचा दौरा करणार आहेत. दौऱ्यावर असलेले मंत्री लोकांशी संवाद साधणार आहेत. तसेच या दौऱ्यादरम्यान ते विकासाच्या मुद्दायावर लोकांशी बोलणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here