प्रशांत जैन

‘बेल बॉटम’ या चित्रपटासाठी अभिनेता अक्षयकुमारनं तब्बल १२६ कोटी रुपये इतकं मानधन घेतल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पडुकोणला शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटासाठी १५ कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे असं कळतं. एकीकडे अभिनेत्यांच्या मानधनाचे आकडे गगनाला भिडत असताना अभिनेत्री मात्र अजूनही त्या तुलनेत कमी मानधनावरच काम करताहेत. त्यांच्यातली ही तफावत आजही तितकीच मोठी आहे.

सिनेवर्तुळातील एका तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, ‘अभिनेता आणि अभिनेत्रींच्या मानधनातील दरी हे सिनेसृष्टीतलं कटू सत्य आहे. गेल्या काही वर्षांत अभिनेत्रींचं महत्त्व वाढलं असून, त्यांच्या मानधनातही वाढ झाली आहे. तरी अभिनेते त्यांच्याहून अधिक मानधन घेत आहेत.’ फिल्म ट्रेड अॅनालिस्ट गिरीश जोहर अभिनेत्रींच्या वाढत्या मानधनाबद्दल सांगतात, ‘बॉक्स ऑफिसचं संपूर्ण गणित हे कलेक्शनवर अवलंबून असतं.

फक्त अभिनेत्री असलेले चित्रपट फार काळ टिकू शकत नाहीत असं पूर्वी बोललं जायचं. पण, गेल्या काही वर्षांतील काही चित्रपटांनी हे ठोकताळे खोटे ठरवले आहेत. त्यांचे चित्रपट यशस्वी ठरल्यामुळे निर्माते आता त्यांना चांगलं मानधन देऊ लागले आहेत.’ इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल गिरीश सांगतात की, सध्याच्या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण आणि ही दोन नावं प्रामुख्यानं घ्यावी लागतील.

‘जजमेंटल’ या चित्रपटासाठी कंगनानं २७ कोटी इतकं मानधन घेतलं होतं. तर तिचा सहकलाकार अभिनेता राजकुमार रावला ८ कोटी मानधन मिळालं होतं. याआधीही कंगनानं ‘रंगून’ चित्रपटाच्या वेळी अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्याहून अधिक मानधन घेतलं होतं. ‘थलायवी’साठी ती ३२ कोटी घेणार असल्याची चर्चा आहे. दीपिका पडुकोणनं ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी १३ कोटी मानधन घेतलं होतं. अभिनेता प्रभासबरोबर असलेल्या आगामी चित्रपटासाठी तिनं २९ कोटींचं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

अभिनेत्यांच्या पुढे…

केवळ दीपिका आणि कंगनाच नव्हे, तर इतरही काही अभिनेत्री त्यांच्या सहकलाकार अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेऊ लागल्या आहेत. ‘राजी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री आलिया भटला १० कोटी तर तिचा सहकलाकार अभिनेता विकी कौशलला ४ कोटी इतकं मानधन मिळालं होतं. तसंच ‘सडक २’साठीही आलियानं अभिनेता आदित्य रॉय कपूरपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं.

तुमचे चित्रपट जसजसे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू लागतात, तसंतसं तुमचं मानधनही वाढत जातं. मग ती एखादी अभिनेत्री असो किंवा अभिनेता.

– आलिया भट, अभिनेत्री

गेल्या काही काळात बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचं मानधन वाढलंय हे खरंय. असं असलं तरीसुद्धा अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या मानधनात आजही खूप फरक आहे.

– गिरीश जोहर, ट्रेड अॅनालिस्ट

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

कंगना रनौत – २७ कोटी

दीपिका पडुकोण – २६ कोटी

श्रद्धा कपूर – २३ कोटी

प्रियांका चोप्रा – २२ कोटी

– २२ कोटी

करिना कपूर – २० कोटी

कतरिना कैफ – २० कोटी

विद्या बालन – १४ कोटी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here