शंकर भगवान वायफळकर (वय ४१) असं जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव असून महेंद्र बाळू कदम (वय ३१) असं आरोपी रिक्षाचालकाचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी दुपारी घडली असून, रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर भगवान वायफळे हे सुरक्षारक्षक आहेत. कंपनीच्या गेटवर ते कर्तव्य बजावत होते. तेव्हा, आरोपी रिक्षाचालक महेंद्र बाळू कदम गेटजवळ कंपनीच्या मालकाच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करत होता. त्यावेळी शंकर यांनी हटकलं आणि लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि आरोपी कदम तिथून रिक्षा घेऊन निघून गेला.
त्यानंतर तो साडे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा आला. त्याने येताना बाटलीतून आणलेलं पेट्रोल शंकर यांच्या अंगावर ओतून त्यांना जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शंकर गंभीर जखमी झाले असून खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी महेंद्र बाळू कदम याला पोलिसांनी अटक केली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times