अहमदनगर: करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक मोठ्या देवस्थांनाना कर्मचारी कपात, पगार कपातीसारखे निर्णय घ्यावे लागले. मात्र, तालुक्यातील येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने कोणतेही कपात केली नव्हती. उलट देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही देण्यात आला. आता मंदीर पुन्हा खुले झाले असून भाविकांची पावले मंदिराकडे वळाली आहेत. (Diwali Bonus to )

देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनील सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड व मिलिंद चवंडके या कार्यरत विश्वस्तांच्या पुढाकारातून कर्मचारी आणि भाविकांच्या हिताचे निर्णय लॉगडाउनच्या काळात घेण्यात आले. मंदीर बंद असलेल्या काळात कर्मचाऱ्यांना कामावर येता आले नाही. शिवाय भाविक नसल्याने दानपेटीत भर पडली नाही. त्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. तरीही आठ महिने घरात बसून असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगार देण्यात आला. त्यांना दिवाळीचा बोनसही देण्यात आला. ग्रामीण भागातील वस्तुस्थिती लक्षात घेऊन कर्मचा-यांच्या संख्येत घट किंवा कर्मचा-यांच्या पगारात कपात केली नाही. यावर्षीची यात्राही होऊ शकली नाही. मात्र, या काळात भाविकांना प्रसाद पोहचविण्याची व्यवस्था देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आली. उलट लॉकडाउनच्या सुरवातीच्या टप्प्याच अडकून पडलेल्यांना याचा मोठा फायदा झाला. या काळात कर्तव्य बजावत असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलिस बांधव तसेच गोर-गरीब गरजूंना श्रीकानिफनाथ देवस्थानकडून नाथप्रसाद पुरवण्याची सेवा करण्यात आली. पाथर्डीमधील शासकीय रूग्णालय, आरोग्यमाता केंद्र, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, सेतू कार्यालय यासह रस्त्यामध्ये आढळणारे गोरगरीब भुकेलेले अशा सर्वांनाच अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. अचडणीच्या काळात भक्तांच्या मदतीला धावून येण्याचे कामच देवस्थान ट्रस्टने केले.

वाचा:

या सेवा कार्यात कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. याची दखल घेऊन देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. धर्मदाय उपायुक्त हिरा शेळके यांनी ट्रस्टच्या या कामाचे कौतूक करून इतरांनी याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here