‘महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. आत्तापर्यंत २२९७ कोटींची मदत दिवाळीच्या आधी दिली आहे. पुढच्या आठवड्यात शेतकरी मदतीचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. १० डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल,’ असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे.
‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला तीन पत्र लिहली, पाहण पथक पाठवण्यासाठी मागणीही करण्यात आली. तरीही केंद्राकडे प्रस्ताव आलाच नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही आणखी एक पत्र पाठवणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसंच, किसान सन्मान योजनेत ६०० कोटींची मदत केंद्र करते तरीपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. शेतकऱ्यांचा अपमान करत आहे,’ असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times