नवी दिल्ली: आयपीएलचा पुढच्या वर्षीचा लिलाव हा सर्वांसाठीच उत्सुकतेचा विषय आहे. कारण या लिलावानंतर बरेच संघ बदलू शकतात, असे म्हटले जात आहे. पण आयपीएलच्या लिलावात वापरून एखादा संघ खेळाडूला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकतो. हे नेमकं कसं शक्य आहे आणि ‘राइट टू मॅच कार्ड’ नेमकं आहे तरी काय, पाहा…

‘राइट टू मॅच कार्ड’ ही गोष्ट नेमकी आहे तरी काय…आयपीएलच्या लिलावापूर्वी प्रत्येक संघ तीन खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. पण अन्य खेळाडूंना त्यांना संघात कायम ठेवता येणार नाही. त्यामुळे आपल्या एखाद्या महत्वाच्या खेळाडूला कोणत्याही संघाला गमवावे लागू नये, यासाठी ‘राइट टू मॅच कार्ड’ ही संकल्पना वापरण्यात आली आहे. ‘राइट टू मॅच कार्ड’नुसार प्रत्येक संघाला आपल्या आवडत्या किमान दोन खेळाडूंना तरी आपल्या संघात कायम ठेवता येऊ शकते.

‘राइट टू मॅच कार्ड’चे उदाहरण जाणून घ्या…आयपीएलचा लिलाव २०१८ साली झाला होता. लिलावामध्ये कोलकाता नाइट राययडर्सच्या संघाने रॉबिन उथप्पाला संघात कायम ठेवले नव्हते. त्यामुळे तो लिलावामध्ये अन्य संघांसाठी उपलब्ध होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सने उथप्पावर सर्वाधिक ६.४० कोटी रुपयांची बोली लावली होती. पण त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स या संघाने ‘राइट टू मॅच कार्ड’ वापरले आणि उथप्पाला ६.४० कोटी रुपयांना आपल्या संघात कायम ठेवले. ‘राइट टू मॅच कार्ड’मध्ये खेळाडूवर जी सर्वाधिक बोली लागली आहे तेवढे पैसे त्याच्या पूर्वीच्या संघाला वापरून त्या खेळाडूला पुन्हा संघात घेता येऊ शकते.

जर एखाद्या संघाने एकाही खेळाडूला संघात कायम ठेवले नसेल तर त्यांना पाच खेळाडूंना ‘राइट टू मॅच कार्ड’ वापरून संघात ठेवता येऊ शकते. पण जर एखाद्या संघाने तीन खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर ‘राइट टू मॅच कार्ड’ त्यांना दोन खेळाडूंसाठीच वापरता येऊ शकते. जर एखादा संघ ‘राइट टू मॅच कार्ड’नुसार पाच खेळाडूंना संघात घेत असेल तर त्याला भारताच्या तीनच अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देता येऊ शकते. अन्य दोन खेळाडू हे भारतीय संघाकडून न खेळलेले असू शकतात किंवा ते परदेशी खेळाडू असू शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here