एमआयएमने बिहार विधानसभा निवडणुकीत ५ जागा जिंकल्या. या यशाने उत्साहित ओवेसी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबतही मोठी घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार, असं ओवेसी म्हणाले. तर पश्चिम बंगालमध्ये एमआयएमने निवडणूक लढवली तरी राज्यात दोन तृतीयांश बहुमताने आमचेच सरकार बनेल, असा विश्वास भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला.
बिहार निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षावर ‘व्होट कटवा’ अशी टीका केली. आता ओवेसींनी पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर निशाणा साधला. चौधरी यांनी आपल्या मतदारसंघातील मुस्लिमांच्या हितासाठी काय केलं?, असं ओवेसी म्हणाले. तसंच एमआयएम २०२२ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे. कुणाशी युती करायची? हे त्यावेळीच ठरवले जाईल, असं असदुद्दीन ओवेसींनी स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times