नवी दिल्ली : फक्त सात दिवसांमध्ये आयपीएल आणि पाकिस्तानमधील लीगचे जेतेपद पटकावण्याचा विक्रम एका खेळाडूने केला आहे. आयपीएलचे जेतेपद मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावले होते. मुंबईच्या संघातही हा खेळाडू होता. त्यानंतर सात दिवसांमध्ये पाकिस्तान सुपर लीगची अंतिम फेरी झाली. या लीगमध्ये कराची किंग्स या संघाने जेतेपदाला गवसणी घातली. या दोन्ही संघांमध्ये एक समान धागा होता, तो म्हणजे वेस्ट इंडिजचा एक खेळाडू.

मुंबई इंडियन्सने १० नोव्हेंबरला दिल्ली कॅपिटल्सवर मात करत यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. त्यावेळी हा खेळाडू मुंबईच्या संघात होता. त्याचबरोबर आज पहिल्यांदा कराचीच्या संघाने पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपद पटकावले, त्यामध्येही हा खेळाडू होता. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. तर हा खेळाडू आहे वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड.

यावर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या संघात जास्त बदल केले नाहीत. त्याचबरोबर चार परदेशी खेळाडू हे सातत्याने खेळत असल्यामुळे शेरफेन रदरफोर्डला यावर्षीच्या आयपीएलमध्ये एकही सामना खेळता आला नाही. आयपीएल संपल्यावर रदरफोर्ड हा पाकिस्तानमध्ये सुपर लीग खेळण्यासाठी दाखल झाला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे फक्त सात दिवसांमध्ये दोन जेतेपदे पटकावण्याचा मान हा रदरफोर्डला मिळाल्याचे पाहायला मिळाले.

रदरफोर्ड जेव्हा तपाकिस्तान सुपर लीगमध्ये फलंदाजीला उतरला होता. तेव्हा त्याने मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रदरफोर्ड हा प्रकाशझोतात आला होता. पण या सामन्यानंतर मात्र रदरफोर्डने आपली चूक सुधारली आणि तो संघाचे ग्लोव्ज घालन मैदानात उतरला होता.

पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम सामन्यात कराची किंग्स या संघाने लाहोर कलंदर्स या संघाला पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली होती. कराची किंग्स या संघाचे हे पाकिस्तान सुपर लीगमधील हे पहिले जेतेपद होते. त्यामुळे रदरफोर्ड हा कराचीच्या संघासाठी लकी ठरला, असेही काही जणांनी म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here