रेवाडीः करोना व्हायरसच्या ( covid19 ) संकटात विविध राज्यांनी सावधगिरीने शाळा उघडण्यास सुरवात केली आहे. पण हरयाणातून ( haryana school ) आलेला एका बातमीने तुमची चिंता वाढू शकते. रेवाडीच्या १२ शाळांमध्ये करोना तपासणी करण्यात आली. यात ७२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इतकच नाही तर मंगळवारी जींदमध्ये ६६ जणांना (८ शिक्षक आणि ११ शालेय मुलांसह) करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सणांमुळे नागरिकांचं फिरणं वाढलं आहे. यामुळेच आम्ही १२ शाळांमधील ८३७ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात ७२ मुलं करोना पॉझिटिव्ह आढळून आले, असं नोडल अधिकारी विजय प्रकाश यांनी सांगितलं.

ज्या शाळांमध्ये विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. मास्क वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक केलं आहे. करोना व्हायरसमुळे संपूर्ण यंत्रणा बंद करता येणार नाही, असं हरयाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर म्हणाले.

‘कठोर कारवाई झाली पाहिजे’

‘आम्ही सर्व सिव्हिल सर्जनना करोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जबाबदार अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी करण्यास सांगितलं गेलं आहे. शाळांसाठी देण्यात आलेल्या करोना मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होतंय का? आणि जिथे नियमांकडे दुर्लक्ष केलं जातंय. नियमांचं पालन होत नाही, तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, असं हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले.

जिंदमध्ये करोनाचा शाळेत प्रवेश

‘जिंदमध्ये मंगळवारी करोना संसर्गाचे ६६ रुग्ण आढळून आले. यापैकी ८ शिक्षक आणि ११ विद्यार्थी आहेत. आरोग्य पथक रोज शाळांमध्ये जाऊन नमुने घेत आहेत. लवकरच सर्व शाळांचे नमुने घेतले जातील, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here