पेरियार हे हिंदू देवदेवतांवर कठोर टीका करायचे. त्याच्या नेतृत्वाखाली १९७१ साली सलेममध्ये झालेल्या सभेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व सीतेचे विवस्त्र फोटो लावण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर कोणीही टीका करायचे नाही,’ असा दावा रजनीकांत यांनी केला होता. ‘तुघलक’ या तामिळी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. द्रविडी पक्ष संघटनांनी रजनीकांत यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाचा:
रजनीकांत मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘पेरियार यांच्याविषयी मी जे काही बोललो ते पूर्णपणे सत्य आहे. त्याबाबतचे अनेक पुरावे आहेत. पेरियार यांच्या त्या सभेचं वार्तांकन करताना अनेक वर्तमानपत्रांनी हे सगळं छापलं होतं. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं रजनीकांत म्हणाले. त्यामुळं आता हा वाद शमतो की चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा: वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times