नगर: संसर्ग रोखण्यासाठी इतर जिल्ह्यांप्रमाणे नगर जिल्ह्यात देखील सार्वजनिक व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र, यापुढे जात आता नगर जिल्ह्यात सार्वजनिक व धार्मिक ठिकाणी करण्यास व थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. यांनी तसे आदेश काढले आहेत. ( Ahmednagar district latest news updates )

वाचा:

सार्वजनिक व धार्मिक स्थळांच्या परिसरात धुम्रपान करणाऱ्या किंवा थुंकणाऱ्या व्यक्तीस शंभर रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड आकारण्याचा अधिकार पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. हा आदेश ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरच्या जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यातच आता राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहे. नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या , येथे जगभरातून भाविक येत असतात. धार्मिक स्थळे खुली करण्यात आल्यामुळे करोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यापूर्वीच जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले असून तसा आदेश काढला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याकडून शंभर रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. आता तर सार्वजनिक व धार्मिक स्थळी थुंकणाऱ्या व धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश भोसले यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे हा दंड वसूल करण्याचा अधिकार पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.

वाचा:

…तर धार्मिक ट्रस्टकडून वसूल केला जाणार खर्च

नगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचे ट्रस्ट, बोर्ड यांना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर्शन व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंगसह रांगाचे नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन, धार्मिक स्थळांचे निंर्जतुकीकरण तसेच भाविकांसाठी सॅनिटायझरची उपलब्धता, थर्मल स्कॅनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी व्यवस्था आदी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास त्यापोटी लागणारा खर्च संबंधित धार्मिक ट्रस्ट, बोर्डकडून वसूल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४३ (१) प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश काढला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागृतीही करीत आहोत. नागरिकांनी देखील शिस्त पाळून सहकार्य करावे. -डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here