कोल्हापूर: विभागीय शिक्षक मतदारसंघात पक्षातील अनेक इच्छूकांना माघार घेण्यास भाग पाडत काँग्रसने जोरदार सलामी दिली. माघारीबरोबरच ताकदीच्या इच्छूकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची भूमिकाही घेतली आहे. दुसरीकडे राज्य शाळा कृती समितीत मात्र फूट पडली आहे. टीडीएफ आणि शिक्षक परिषदेने तयारीसह मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मैदानात ३५ उमेदवार असले तरी सामना मात्र चौरंगी होण्याचीच दाट चिन्हे आहेत. पक्षीय उमेदवारांसमोर दोन बलाढ्य संघटनांचेच मोठे आव्हान उभे आहे. ( Latest Updates )

वाचा:

पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातील माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पन्नास इच्छूकांनी अर्ज भरले होते, मात्र यातील १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मुलाखती दिलेले दादासाहेब लाड, खंडेराव जगदाळे, सुजाता माळी आणि बाबासाहेब पाटील या ताकदीच्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यांनी माघार घेताना काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. यामुळे काँग्रेसचे प्रा. यांना बळ मिळाले आहे. यातील पाटील हे राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष आहेत. या संघटनेच्या बळावर निवडून आलेले विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांच्यावर आरोप करत त्यांनी संघटनेला रामराम केला आहे. यामुळे या संघटनेत फूट पडली आहे. त्यामुळे रिंगणात असलेल्या आमदार सावंत यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाचा:

शिक्षक मतदारसंघात टीडीएफ आणि शाळा कृती समितीमध्ये प्रत्येक निवडणुकीत चुरस असते. यंदा टीडीएफच्या वतीने रिंगणात आहेत. पाच जिल्ह्यात संघटनेचे काम प्रभावी असल्याने संघटनेच्या भूमिकेला महत्त्व आहे. भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार पाच वर्षे जोरदार तयारी करत निवडणुकीत उतरल्याने त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांच्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रा. एन. डी. चौगुले यांनी माघार घेतली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात आसगावकर, थोरात, पवार आणि सावंत यांच्यातच चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी एकसंघ राहिली तर काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे, पण रयत, भारती, विवेकानंद अशा संस्था काय भूमिका घेणार यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.

वाचा:

या निवडणुकीत विविध पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी आमदार होण्यासाठी प्रचाराला लागले आहेत. सुटाचे प्रा. सुभाष जाधव, टॅफनॅपफचे प्रा. नितीन पाटील, मनसेचे , वंचित बहुजन विकास आघाडीचे सम्राट शिंदे आणि प्रा. राजेंद्र कुंभार, करणसिंह सरनोबत, प्रकाश पाटील यांच्यासह ३५ उमेदवार रिंगणात आहेत. हे सारे कुणाची मते घेणार यावरही निकालाचा कल अवलंबून राहण्याची शक्यता आहे. मतांची विभागणी होण्याची चिन्हे असल्याने त्याचाही निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळांना सुट्टी असल्याने शिक्षकापर्यंत पोहोचण्याची मोठी कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. केवळ दहा दिवसात हे अवघड काम करावे लागणार असल्याने उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे आहे. पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी गावोगावी आहेत. त्यांनीच प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. यामुळे दिवाळी संपताच प्रचाराला वेग आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here