कूचबिहार जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सवाल उपस्थित केला. कायदा व सुव्यवस्था राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, हे आपण राज्य सरकारला नेहमीच सांगत आलोय. काही अधिकारी खरोखरच चांगलं काम करत आहेत. राजकीय हिंसाचार आपण थांबवायला हवा, असं राज्यपाल म्हणाले.
राज्यात हिंसेशिवाय स्वतंत्र आणि नि: पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी आपले अधिकार वापरून सर्वकाही करेन. निकालांशी आपला काही संबंध नाही. फक्त कायदा आणि मतदारांचे समाधान राखण्यासाठी हे करणं आवश्यक आहे, असं राज्यपाल म्हणाले.
दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपवर हल्ला चढवला आहे. शांतता भंग करण्यासाठी निवडणूकीपूर्वी बाहेरचे लोक, गुंडांना पश्चिम बंगालमध्ये आणलं जात आहे. भाजपने इतकी खालची पातळी गाठू नये. मी जनतेबरोबर आहे. जनतेने काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यावर हल्ला करु नये, अशा सूचना पोलिसांना केल्या आहेत. बंगाल घाबरट राज्य नाही, असं म्हणत ममता बॅनर्जींनी भाजपला सुनावलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times