नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत करोनाचा ( ) कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत ७४८६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दिल्लीत एका दिवसात करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्यने विक्रम केला आहे. यापूर्वी १२ नोव्हेंबरला दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलेटिनमध्ये २४ तासांत १०४ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला होता.

दिल्लीत करोना आतापर्यंत एकूण ७९४३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या ४२४५८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिल्लीत करोना रूग्णांची एकूण संख्या ५ लाखांवर गेली आहे. राजधानीत करोनाची रुग्णांची सख्या ५०३०८४ इतकी झाली आहे.

यापूर्वी दिल्लीत मंगळवारी ६३९६ करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले. तर ९९ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत करोनाने रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण आणि झपाट्याने वाढणारे नवीन रुग्णांमुळे चिंता वाढत चालली आहे.

दिल्लीत करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केजरीवाल सरकारने केंद्राला गर्दी होत असलेले बाजार बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तसंच लग्न समारंभात २०० च्या ऐवजी फक्त ५० पाहुणांना येण्याची परवानगी दिलीय.

दिल्लीतील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारनेही तयारी केलीय. दिल्लीत होम आयसोलेशनमध्येही जास्त रुग्ण आहेत. दिल्लीतील ९० टक्के आयसीयू बेड भरले आहेत. केंद्राकडून २५० आयसीयू बेड लवकरच मिळणार आहेत. केंद्राकडून दिल्ली सरकारला एकूण ७५० आयसीयू बेड देण्यात येणार आहेत, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं.

दिल्लीत २६ हजार करोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत करोनाचे १६ हजार बेड आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती सकाळ आणि संध्याकाळ डॉक्टर फोन किंवा व्हिडीओ कॉलवर घेत आहेत. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here