कोल्हापूर: तिरुपतीला जाणारं विमान रद्द केल्यानं संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीकेल्याचा प्रकार कोल्हापूर विमान तळावर घडला आहे. थंडी वाढल्यानं दृश्यमानता कमी झाल्यानं विमानसेवेवर परिणाम झाला. त्यामुळं कोल्हापूरहून तिरुपला जाणारं विमान अचानक रद्द करण्यात आलं.
विमान रद्द झाल्याचं कळताच प्रवासी संतापले. संतप्त प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचा-यास जाब विचारत धक्काबुक्की केली. त्यानंतर प्राधिकरणच्या अधिका-यांनी दिलगिरी व्यक्त करीत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिलं.
वाचा:
ऐनवेळी विमान रद्द करण्याचे प्रकार वाढल्यानं प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times