वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये भारतीय वंशाच्या दोनजणांचा समावेश होऊ शकतो. अमेरिकेत थैमान घालत असलेल्या करोनाला अटकाव करण्यासाठी विवेक मूर्ति यांना आरोग्य खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. तर, अरूण मजुमदार यांना ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.

विवेक मूर्ति हे सध्या बायडन यांच्या सल्लागारांच्या टीममध्ये आहेत. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याबाबतच्या उपाययोजनांवर काम करत आहेत. अमेरिकेतील निवडणुकीनंतर सत्ता हस्तांतरणात कोविड-१९ विषयक सल्लागार बोर्डाचे सह अध्यक्ष आहेत. त्यामुळेच बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान मिळू शकते. स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरूण मजुमदार हे ‘अॅडव्हान्स रिसर्च प्रॉजेक्टस एजेन्सी-एनर्जी’चे पहिले संचालक होते. त्याशिवाय बायडन यांच्या ऊर्जा संबंधित विषयावर बायडन यांचे सल्लागार होते.

वाचा:

‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘पॉलिटिको’ यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऊर्जा मंत्री पदासाठी माजी ऊर्जा मंत्री अर्नेस्ट मोनिज, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संशोधक डॅन रीचर आणि माजी उप ऊर्जा मंत्री एलिजाबेथ शेरवूड रँडल यांचीही नावे चर्चेत आहेत. आरोग्य आणि मानव सेवा मंत्रीपदासाठी विवेक मूर्ति यांच्यासह उत्तर कॅरिलोनाचे आरोग्य आणि मानव सेवा मंत्री मँडी कोहेन आणि न्यू मेक्सिकोच्या राज्यपाल मिशेल लुजान ग्रीशम यांनाही दावेदार समजले जात आहे.

वाचा:

जो बायडन हे जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. मात्र, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्यापही आपला पराभव मान्य केला नाही. ट्रम्प यांच्याकडून आपणच विजयी झालो आहोत असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेत पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.

वाचा:

दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आधापासूनच भारत-अमेरिकेच्या सौहार्दपूर्ण संबंधांचे पुरस्कर्ते असून, आतादेखील त्यांचे सरकार उभय देशातील द्विपक्षीय संबंधांमध्ये सुरक्षा आणि संरक्षणाच्या मुद्द्यास प्राधान्य देईल, असे मत ओबामा सरकारच्या कार्यकाळात काम केलेल्या वरिष्ठ अधिकारी एलिसा आयरस यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here