म. टा. प्रतिनिधी, मुंबई

वीज विभागातील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीला बोनस मिळणार की नाही, अशी शंका असतानाच डॉ. नितीन राऊत यांनी १३ नोव्हेंबरला बोनस देण्याला तत्त्वत: मंजुरी दिली. त्यामुळे कर्मचारी आनंदात होते. परंतु अद्यापही त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम पडलेली नाही. देयकांबाबत वीजग्राहकांच्या दिवाळी आनंदावर ऊर्जामंत्र्यांनी विरजण टाकले. त्याचप्रमाणे आता बोनसची घोषणादेखील हवेतच उडून जाईल का, अशी अस्वस्थता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

वीजदेयकांत कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याचे स्वतः ऊर्जामंत्र्यांनी मंगळवारी सांगितल्यावर बुधवारी महावितरणसह ऊर्जा विभागातील विविध कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. बोनसविना गेलेली ही ऊर्जा विभागाच्या इतिहासातील पहिली दिवाळी होती. याआधी एकदाच १० वर्षांपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या हाती बोनसचे धनादेश होते. कार्यालयांमधील रोखपाल सायंकाळी उशिरापर्यंत धनादेश वितरित करीत होते. पण ते वर्ष सोडता आजवर प्रत्येकवेळी धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी कर्मचाऱ्यांच्या हातात बोनसचे पैसा मिळत होते. पण यावर्षी दिवाळी सरली तरी बोनसची रक्कम, धनादेश किंवा लेखी आश्वासन, असे काहीच कर्मचाऱ्यांच्या हातात नाही. त्यातून वीजदेयकांसंबंधीचा शब्द ऊर्जा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here