कोलकाता : बिहारमध्ये पक्षानं झेंडा रोवल्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षानं आता आपलं लक्ष पश्चिम बंगालकडे केंद्रीत केलंय. अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांच्यासमोर हातमिळवणीचा प्रस्ताव मांडलाय.

आगामी निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला मदत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वीच महाआघाडीचा प्रस्ताव असदुद्दीन ओवैसी यांनी ममता बॅनर्जींसमोर मांडलाय.

उल्लेखनीय म्हणजे, नुकतंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एआयएमआयएम आणि अदुद्दीन ओवैसी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्ला केला होता. राज्यातील जनतेला ‘बाहेरच्यांना’ विरोध करण्याचं आवाहनही ममता बॅनर्जी यांनी केलं होतं.

बिहार निवडणुकीनंतर ‘वोटकटवा’ आणि ‘भाजपची बी टीम’ म्हणत काँग्रेसनंही एआयएमआयएमवर निशाणा साधला होता. तसंच तृणमूल खासदार सौगता रॉय यांनीही, भगव्या पक्षानं () तृणमूलची मतं विभागण्याचं काम एआयएमआयएमला दिल्याची टीका केली होती. मुस्लीम मतांची विभागणी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना नुकसान हे एकमेव एआयएमआयएमचं उद्दीष्ट असल्याची टीका या पक्षांकडून करण्यात आली होती.

वाचा : वाचा :

अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत करण्यासाठी असदुद्दीन ओवैसी प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येतेय. त्यानंतर, पश्चिम बंगालमध्ये भाजपला हरवण्यासाठी आपण ममता बॅनर्जींना मदत करण्यासाठी तयार असल्याचं असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर केलंय.

बिहारच्या सीमांचल भागात पाच विधानसभा जागांवर ताबा मिळवल्यानंतर एआयएमआयएचा आत्मविश्वास दुणावलाय. अशावेळी ओवैसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलंय.

पश्चिम बंगालमध्ये मुख्य टक्कर आणि भाजपमध्ये दिसून येईल, हे स्पष्ट आहे. परंतु, पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर या भागांत मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. या भागावर एआयएमआयएमकडून लक्ष केंद्रीत केलं जाऊ शकतं.

एआयएमआयएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील स्वतंत्र एन्ट्री ही तृणमूल काँग्रेससाठीही धोक्याची ठरू शकते, असं म्हटलं जातंय. भाजपसोबतच काँग्रेस आणि डाव्यांनाही ममता तोंड देत आहेत. त्यातच ओवैसींच्या पक्षाचा राज्यातला प्रवेश ममतांसाठी आणखी डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here