शीतल आखाडे

अत्यंत दुर्मिळ असा ” हा रक्तगट असलेला एक रक्तदाता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला आहे. जिल्ह्यातील जवळच्या रेवाताळे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी या तरुणामध्ये हा रक्तगट आढळून आला. दहा लाख लोकसंख्येमध्ये केवळ चार व्यक्तींमध्ये हा रक्तगट आढळून येतो, अशी माहिती सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी दिली.

या दुर्मिळ रक्तगटाचा शोध सर्वप्रथम मुंबईतील केईएम रुग्णालयात लागला होता. रुग्णालयातील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी १९६२ मध्ये हा शोध लावला होता. मुंबईत शोध लागल्यानं ‘बॉम्बे ब्लड ग्रूप’ असं त्याचं नामकारण करण्यात आलं होतं. आता जगभरात याच नावानं तो रक्तगट ओळखला जातो. ‘अँटीजन एच’ या घटकामुळं हा रक्तगट इतर गटांपेक्षा वेगळा ठरतो. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतरांना चालू शकते. मात्र, इतर व्यक्तींचे रक्त ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असलेल्या व्यक्तीला चालत नाही. केवळ तो रक्तगट असलेल्या व्यक्तीच त्यास रक्त देऊ शकतात.

वाचा:

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि ASD86 फाऊंडेशन, या दोन संस्था रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी गेली ३२ वर्षे काम करीत आहेत. ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ विषयीची माहिती शिबिराच्या माध्यमातून मिळाल्यानंतर त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला. स्थानिक वर्तमानपत्र आणि आकाशवाणीच्या बातम्यामुळे ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आणि पंकज गावडे या दोघांची माहिती देशभर गेली. एका अर्थानं मालवण आणि पंकज यांचंही नावं सर्वदूर पसरलं.

वाचा:

रक्तदान करून रुग्णसेवा करण्यास आपण केव्हाही, कोठेही जाण्यास तयार आहोत, असं या रक्तदात्यानं आपल्या सत्कार समारंभात सांगितलं. पंकज गावडे हा मालवणच्या एम.आय.डी.सी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) येथे काम करतो. रक्दानासारख्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. ‘आपल्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं तो आनंदित झाला आहे आणि अधिक जोमानं कार्य करू, असं त्यानं म्हटलं आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

103 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here