मंबई: मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकावण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भाजप मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. भाजप नेते यांनी मनसे- भाजप युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतर भाजपनं ही शिवसेनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा चंग भाजपनं बांधला आहे. महापालिका निवडणुकांसाठी भाजप मनसेसोबत युती करणार असल्याचं बोललं जातंय. प्रवीण दरेकर यांनीही मनसेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

निवडणुकीत भाजप – मनसे युती होणार का? या प्रश्नावर प्रवीण दरेकर यांनी उत्तर देताना, ‘आजतरी भाजपा स्वबळावर लढण्याची तयार करत आहे. पण, निवडणुकींच्या वेळी याबाबत निर्णय घेऊ,’ असं स्पष्ट संकेत दिले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते यांच्या टीकेवरही प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. “मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं शिवसेना सांगते. आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? आम्ही कोण आहोत. भाजपामध्ये मराठी माणसं नाहीत का?, छत्रपतींचा भगवा शिवसेनेला पेटंट दिला आहे का? भगवा आमचा नाही, भगवा तुमचा नाही भगवा छत्रपतींचा आहे. त्या भगव्याशी तुम्ही प्रतारणा करताय. त्यामुळे त्या भगव्याला हात लावण्याचं तुम्ही काय ते ठरवा. राम मंदिराच्या बाबतीत तुमची भूमिका पाहिली आहे. ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. त्यामुळे संजय राऊत म्हणाले आहेत ते खरं आहे की भगवा कोणाच्या हातात द्यायचा हे जनताच ठरवणार आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here