अमृता फडणवीस यांनी एक सर्वसामान्य महिला म्हणून ट्वीटच्या माध्यमातून सर्व देशभक्त पुरुषांना आवाहन केलं आहे. सर्व देशभक्त पुरुषांनी एकत्र यावं आणि वाईट विचारांच्या काही मोजक्या ‘नॉटी’ पुरुषांच्या विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यात मदत करावी,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. #toiletday #InternationalMensDay असे हॅशटॅगही त्यांनी ट्वीट केले आहेत.
मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत शिवसेनेच्या रडारवर आली होती. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल बोलताना ‘हरामखोर’ शब्द वापरला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर मला ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांना टोला हाणला होता. ‘आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा हे जास्त नॉटी निघाले’ असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या ताज्या ट्वीटचा रोखही राऊतांकडेच असल्याचं बोललं जात आहे.
वाचा:
अमृता फडणवीस सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्यापासून त्या अधिकच आक्रमक झाल्या आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्या ठाकरे सरकार व शिवसेनेच्या नेत्यांना लक्ष्य करत असतात.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times