कराची बेकरीचे नाव बदला किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, असं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालाणार नाहीत. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर असं नाव चालणार नाही, असा इशारा नांदगावकर यांनी या बेकरीच्या मालकांना दिला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले आहेत.
‘भारतातील चायनीज हॉटेलांचा जसं चीनसोबत काही संबंध नाही तसाच, वांद्रे येथील कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. हे सत्य शिवसेनेचे मुर्ख कार्यकर्ता कधी समजणार? ७० वर्षांच्या दुकानाचं नाव बदलण्याची जी धमकी दिली आहे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुकानाला संरक्षण द्यावे,’ असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times