म. टा. प्रतिनिधी, जळगाव: अभिनेत्री विरुद्ध दाखल असलेल्या खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तीच्या कायदेशीर कारवाईला शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले.

आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. कंगनाने या समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. अर्थात पोलीस याकरता तिला त्वरित अटक देखील करू शकतात. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात, असे मतही उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

कंगना राणावत पोलिसांच्या समन्सला दाद देत नसेल किंवा पोलिसांना चौकशीकामी सहकार्य करत नसेल, तर पोलिस कोठडीची मागणी करू शकतात. पोलिसांना कोठडी मागण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे. यात न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्न येत नाही. कारण न्यायालयाने पोलिसांना कंगना विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत. असेही यांनी यावेळी सांगीतले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here