ठाणे: मध्य रेल्वेवरील डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान राजेंद्र नगर- पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानं कल्याणहून मुंबईकडे येणारी जलद वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जलद मार्गावर पाटण एक्स्प्रेस उभी असल्याने जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसौय झाली आहे.
जलद मार्गावर राजेंद्र नगर- पाटणा एक्स्प्रेस बंद पडल्याने कल्याणकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनेसकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. बंद पडलेल्या इंजिनाती दुरुस्ती करण्यासाठी किंवा एक्स्प्रेसला नवे इंजिन जोडण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यानच्या काळात जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ नयेत यासाठी जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रकही कोलमडले आहे. या मुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोदी गर्दी उसळली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times