तिरुनेलवेली (तामिळनाडू): मालगाडीवर (goods train) चढून (selfie) घेण्याच्या नादात करंट लागून एका मुलाचा आपले प्राण गमवावे लागले. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. गणेश्वर असे या मुलाचे नाव असून तो अवघ्या १५ वर्षांचा आहे. गणेश्वरचे वडील राज्य सरकारमध्ये गुणवत्ता निरीक्षक पदावर काम करतात. मुलाचे वडील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या धान्याचे निरीक्षण करण्याचे काम करतात. ( due to while climbing on in )

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडीवर चढून सेल्फी घेण्याचा विचार गणेश्वरच्या मनात आला. क्षणाचाही विचार न करचा तो मालगाडीवर चढला आणि सेल्फी घेऊ लागला. गणेश्वर बेसावध होता. मालगाडीच्या वरून विजेच्या तारा जात असल्याचे त्याने लक्षातच घेतले नाही.

क्लिक करा आणि वाचा बातमी-
मालगाडीवरून जवळच्याच अंतरावरून जाणाऱ्या या विजेच्या तारा २५,००० व्होल्टच्या होत्या. सेल्फी खेचण्याच्या नादात गणेश्वर या तारांच्या संपर्कात आला आणि त्याचा जागच्याजागीच मृत्यू झाला. गणेश्वरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.

क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here