मुंबई: राज्यात करोना रुग्णांच्या आकडा पुन्हा एकदा वाढल्यानं चिंता वाढली आहे. आज राज्यात १५४ रुग्ण करोनामुळं दगावले आहेत. तर, आज ५ हजारांच्यावर करोना रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात गेल्या सात महिन्यांपासून करोनानं थैमान घातलं होतं. त्यानंतर गेल्या एक महिन्यांपासून करोना ससंर्गाला राज्यात ब्रेक मिळाला होता. मात्र, आजच्या आकडीवारीनुसार करोना रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढलेली दिसत आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. करोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यात आजची रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा आहे.

आज राज्यात राज्यात १५४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या ४६ हजार ३५६ इतकी झाली आहे. तर, आज ५ हजार ५३५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर, ५ हजार ८६० नवीन रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ७९ टक्के इतके झाले आहे.

आज राज्यात ५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढल्यानं एकूण रुग्णसंख्या १७ लाख ६३ हजार ०५५ इतकी झाली आहे. तर, रुग्ण बरे होण्याची एकूण संख्या १६ लाख ३५ हजार ९७१ इतकी झाली आहे. सध्या राज्यात ७९ हजार ७३८ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here