वाचा:
मदान यांनी सांगितले की, राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्भवल्याने १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी ३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या वरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुढील बदल करण्यात आले आहेत.
वाचा:
नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे, असे मदान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या वर्षभरात राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. शिवसेना-भाजप युती तुटून उदयाला आली आहे. , काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान असलेली ही आघाडी एकजुटीने निवडणुकांनाही सामोरी जात आहे. त्यामुळेच गावपातळीवरही त्याचे पडसाद उमटणार आहेत. राज्यात निर्माण झालेल्या नवीन समीकरणांमुळे गावांतील राजकारणातही नवे रंग भरले जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यामुळेच चुरस वाढणार हे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांची प्रतिष्ठाही या निमित्ताने पणास लागणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times