भोपाळः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचं बुधवारी निधन झालं. भोपाळमधील नॅशनल हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी साधना सिंह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्यासोबत अन्य नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे सासरे हे ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला देवी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. घनश्यामदास मसानी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३२ ला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने भोपाळमध्ये निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव आज गोंदियाला आणण्यात येणार आहे. गोंदियातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here