तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध यशस्वी मोहीम राबवल्याबद्दल यांनी सुरक्षा दलांचं कौतुक केलं. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांमध्ये चांगला समन्वय दिसून आला, असं नरवणे म्हणाले.
जैश-ए-मोहम्मदशी संबंध!
‘सुरक्षा दलांनी केलेली ही एक अतिशय यशस्वी कारवाई होती, असं नगरोटामधील यशस्वी मोहीमेनंतर लष्कर प्रमुख जनरल नरवणे म्हणाले. प्रत्यक्षात स्थानिक स्तरावरही सर्व सुरक्षा दलांमधील उच्च पातळीचे समन्वय यातून दिसून येतो. या कारवाईतून शत्रू आणि दहशतवाद्यांना एक स्पष्ट संदेश जातो. जे कोणी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर अशीच कारवाई केली जाईल आणि ते परत जाऊही शकणार नाहीत, असं नरवणे यांनी सांगितलं.
नगरोटामध्ये सुरक्षा दलांनी यशस्वी कारवाई केली. या कारवाईत ठार झालेले चार दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times