विशेष म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांचे लक्ष्य ठरलेले शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांनी मुख्यमंत्री ( nitish kumar ) यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. चौधरी यांनी सोमवारी नितीशकुमार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांचा राजीनामा राज्यपाल फागु चौहान यांनी स्वीकारला आहे.
राज्यातील मुख्य विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (RJD) देखील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांना साधं राष्ट्रगीतही माहिती नाही, असा दावा त्या व्हिडिओतून करण्यात आला होता. “बिहारचे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी, भ्रष्टाचाराच्या खटल्यांमध्ये आरोपी आहेत. त्यांना राष्ट्रगीतही माहित नाही .. नितीशकुमार यांनी लाजही वाटत नाही का? विवेक कोठे बुडाला?”, असं ट्विट आरजेडीने केलं होतं.
आरजेडीने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही एका व्हिडिओतून लक्ष्य केलं गेलं. नितीशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचाऱ्याचा समावेश का केला? सबौरमधील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना तेथील नोकर भरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मेवालाल चौधरी यांच्यावर आहे. या प्रकरणी नितीशकुमार यांच्या जेडीयूनेही त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times