म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

प्रेमाला नकार दिला म्हणून एका प्रेमवीराने मैत्रिणीच्या नावाने पत्र लिहून चक्क आणि येथील एक प्रसिद्ध शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी नुकतीच करणाऱ्या या तरुणाला अटक केली.

दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात असलेल्या सौदी अरेबियाच्या दूतावासामध्ये गेल्या आठवड्यात पोस्टाने एक पत्र आले. यामध्ये दूतावासाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दोनच दिवसांनी वर्सोवा येथील एका नामवंत शाळेच्या व्यवस्थापनाला अशा प्रकारचे पत्र मिळाली. दोन्ही पत्रांमध्ये पत्र पाठविणाऱ्या महिलेचे नाव आणि पत्तादेखील देण्यात आला होता. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी या पत्राची गंभीर दखल घेत याबाबतची माहिती कफ परेड पोलिसांना दिली. कफ परेड पोलिसांनी पत्रामधील नाव आणि पत्त्यावरून त्या महिलेला शोधून काढले. आपण कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे या महिलेने सांगताच पोलिसांनी सखोल चौकशी केली असता एक व्यक्ती लग्नासाठी मागे लागला असल्याचे तिने सांगितले. सुजित गिडवाणी (४५) असे व्यक्तीचे नाव असून नकार देऊनही तो पिच्छा सोडत नसल्याचे ती म्हणाली.

लोखंडवाला परिसरात कुटुंबियांसोबत राहणाऱ्या सुजित गिडवाणी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सुजित याने बॉम्बने उडविण्याची धमकी देणारी दोन्ही पत्रे आपणच पाठविल्याची कबुली दिली. लग्न जमत नसल्याने सुजित तणावाखाली होता. एका डेटिंग अॅपवरून ओळख झाल्यानंतर तो या तरुणीच्या प्रेमात पडला आणि लग्नासाठी मागणी घालू लागला. वारंवार मागणी घालूनही तरुणी नकार देत असल्याने तिला धडा शिकविण्यासाठी त्याने हा खोडसाळपणा केला. पत्रामध्ये नाव आणि पत्ता लिहिल्यावर पोलिस या तरुणीला अटक करतील, असे वाटल्यानेच ही धमकी दिल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here